सुभाष देसाई यांचे पुत्रं भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटातून आली पहिली प्रतिक्रिया

सुभाष देसाई यांचे पुत्रं भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटातून आली पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 13, 2023 | 7:30 PM

VIDEO | 'अशी प्रवृत्ती गेल्याने फरक पडणार नाही', भूषण देसाई यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशानंतर ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश झाला असून त्यांनी शिवबंधन बांधले आहे. राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर भूषण देसाई यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशानंतर ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी भूषण देसाई यांच्या शिवसेनेच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली असून सुभाष देसाई यांच्या मुलाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काहीही हातभार नव्हता. सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या मुलाचा हातभार नसून भूषण देसाई स्वतःच्या फायद्यासाठी आणि दबावाला घाबरून ते शिवसेनेत गेले असावे, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. वडिलांच्या मंत्रिमंडळाचा ८ वर्ष फायदा घ्यायचा आणि मग पक्ष सोडायचा असे सुरू आहे, अशी प्रवृत्ती गेल्याने शिवसेनेत फरक पडणार नाही, असे टीकास्त्रही वैभव नाईक यांनी सोडले.

Published on: Mar 13, 2023 07:20 PM