अमावस्या-पौर्णिमेला शेती, नेमकं कुठलं पीक लावतात? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
अमावस्या आणि पौर्णिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेती करतात, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना खोचक टोलाही लगावला आहे. आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखा भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : मुख्यमंत्री शेतात कुठलं पीक लावतात? गावात रस्ता नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जातात, असे वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर अमावस्या आणि पौर्णिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेती करतात, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना खोचक टोलाही लगावला आहे. आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखा भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे असेही म्हणाले की, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला आता मंत्रालय देखील गुजरातला हलवतील. जाहिरांतीवर खर्च होतो. येथे विकास स्वत:चा, कंत्राटदार यांचा होतो. पण सामान्य नागरिकांचा विकास होत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. तर दुकानदारांकडून वसूली केली जाते मात्र यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पण शेतात दोन हेलिकॉप्टर उतरतात. हे शेतीपण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात. जो व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी खंजीर खूपसू शकतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.