रवी राणा यांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ

रवी राणा यांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Feb 22, 2024 | 3:16 PM

उद्धव ठाकरे भाजपमध्ये येतील असा घणाघात अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. इतकंच नाहीतर ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून महायुतीमध्ये सामील होतील, असा दावाही त्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा दावा केलाय

अकोला, २२ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे भाजपमध्ये येतील असा घणाघात अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. इतकंच नाहीतर ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून महायुतीमध्ये सामील होतील, असा दावाही त्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठं वक्तव्य केले आहे. निवडणुकीपूर्वी रवी राणा यांची बायको त्यांना सोडून जाईल, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. उद्धव ठाकरे भाजपमध्ये जातील म्हणजे रवी राणा यांची बायको त्याला सोडून जाईल हा अशातला प्रकार असल्याचं देशमुख म्हणाले आहे. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Feb 22, 2024 03:16 PM