‘किरीट सोमय्या हा ब्लॅकमेलर’; ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट आरोप
सोमय्या यांनी महानगरपालिकेच्या जागेवर वायकर यांनी आरोप केला होता. तर त्याप्रकरणी सोमय्या यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून वायकर अडचणीत आले होते. तर याप्रकरणी त्यांची काल (५ ऑगस्ट) तब्बल पाच तास चौकशी झाली होती.
मुंबई, , 06 ऑगस्ट 2013 | भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यावरून आरोप केले होते. सोमय्या यांनी महानगरपालिकेच्या जागेवर वायकर यांनी आरोप केला होता. तर त्याप्रकरणी सोमय्या यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून वायकर अडचणीत आले होते. तर याप्रकरणी त्यांची काल (५ ऑगस्ट) तब्बल पाच तास चौकशी झाली होती. त्यानंतर आज मुंबईतील आरे कॉलनी येथे जागतिक मित्र दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमानंतर वायकर यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. वायकर यांनी सोमय्या हा ब्लॅकमेलर आहे, खोटे आरोप करतो, ब्लॅकमेल करतो असे गंभीर आरोप केले आहेत. त्याच्याकडे कोणतेही पुरावे नसताना तो असे करत आहे. तर आता मातोश्रीबाबत ही आरोप करत आहे. याच्याआधी केलेले बांधकाम हे आधीच्या पॉलिसीनुसार केलं होतं. तर आता आलेल्या नव्या पॉलिसीनुसार बांधकाम तोडून काम करत आहोत. मात्र सोमय्या म्हणतायत दडपण आलं. त्यांनी जे आरोप केलेत ते चुकीचे असून तेच खरे आरोपी आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.