ठाकरेंचे आमदार रवींद्र वायकर यांच्यामागे ईडी अन् त्यांची शिंदे गटात उडी?
गेल्याच महिन्यात रवींद्र वायकर यांच्यावर ईडीचे छापे पडले होते. विशेष म्हणजे त्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. तेच वायकर आता भाजपसह सत्तेतील सहकारी असणार आहे. वायकर भाजपसोबत सत्तेतील सहकारी बनल्याने भाजपची भूमिका काय याची प्रतिक्षा आता सगळ्यांना आहे.
मुंबई, ११ मार्च २०२४ : ज्या रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सभा घेतली. तेच आमदार २४ तासांच्या आत शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेत. गेल्याच महिन्यात रवींद्र वायकर यांच्यावर ईडीचे छापे पडले होते. विशेष म्हणजे त्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. तेच वायकर आता भाजपसह सत्तेतील सहकारी असणार आहे. ९ जानेवारीला रवींद्र वायकर यांच्यावर ईडीचा छापा पडला. तेव्हाच त्यांच्यावर भाजपकडून शिंदे गटात येण्याचा दबाव असल्याचा आरोप झाला. मुंबईतील जोगेश्वरी येथील ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे एकनिष्ठ आमदारांपैकी एक होते. त्यांच्यावर भाजपने कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात ईडीने त्यांच्यावर छापे मारले तर त्यांना तुरूंगात जावं लागेल असा इशारा भाजप नेते देत होते. मात्र तेच वायकर भाजपसोबत सत्तेतील सहकारी बनल्याने भाजपची भूमिका काय याची प्रतिक्षा आता सगळ्यांना आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट