तुमचा बॉस सागर बंगल्यावर, तुम्ही तिथे वॉचमनगिरी करताय, नितेश राणेंवर कुणाचा प्रहार?

तुमचा बॉस सागर बंगल्यावर, तुम्ही तिथे वॉचमनगिरी करताय, नितेश राणेंवर कुणाचा प्रहार?

| Updated on: Apr 05, 2024 | 5:27 PM

तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो. आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि तुम्ही तिथे वॉचमनगीरी करताय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे, असं म्हणत वैभव नाईक यांनी नितेश राणेंना खोचक टोला लगावलाय

आम्ही एकनिष्ठ आणि निष्ठावंत आहोत आणि मातोश्रीबरोबर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारच, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त करत भाजप नेते नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो. आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि तुम्ही तिथे वॉचमनगीरी करताय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे, असं म्हणत वैभव नाईक यांनी नितेश राणेंना खोचक टोला लगावलाय. पुढे वैभव नाईक असेही म्हणाले की, तुम्हाला एकच सल्ला, तुमचे वडील केंद्रीय मंत्री असूनदेखील त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळालेलं नाही. आपण वॉचमन असल्याने त्यांना तिथून तिकीट देण्यासाठी प्रयत्न करावेत. तरच तुमच्या वॉचमनगिरीचा आणि बॉसचा वडिलांना फायदा होईल, असा निशाणाही त्यांनी नितेश राणेंवर साधला.

Published on: Apr 05, 2024 05:27 PM