नितेश राणे धर्मा-धर्मामध्ये वाद निर्माण करतायत, ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात
VIDEO | जातीय वाद झाल्यानंतर आता धर्मा-धर्मामध्ये वाद करतायत, नितेश राणे यांच्यावर कुणी केला हल्लाबोल
सिंधुदुर्ग : जातीय वाद झाल्यानंतर आता धर्मा-धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं काम भाजपचे आमदार नितेश राणे करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. १९९३ च्या दंगली थांबण्यासाठी शिवसेनेने काम केलं हे हिंदुना माहिती आहे. शिवसेना दंगली घडवत नाही. नितेश राणे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी उलटसुलट आरोप करत आहेत. कपडे बदलतात तसे ते पक्ष बदलतात आणि जसं ते पक्ष बदलतात तसे ते विचार बदलतात असा प्रश्न नितेश राणे यांना पुण्यातील पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांचं उत्तर त्यांना देता आलं नाही. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे असं म्हणत वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना पुन्हा डिवचलं आहे.
Published on: May 21, 2023 05:04 PM
Latest Videos