राणेंनी किरण सामंतांना दम दिला म्हणून उमेदवारी मागे? उबाठा नेत्याचा हल्लाबोल
रत्नागिरी- सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे म्हणत उदय सामंत म्हणाले, शिंदेंना त्रास होऊ नये, म्हणून किरण सामंतांनी माघारीची पोस्ट डिलीट केली असल्याचे म्हटले तर यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नसून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच कायम आहे. दरम्यान, किरण सामंत यांनी आपण रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून माघार घेत असल्याची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. पण ती पोस्ट किरण सामंत यांनी डिलीट केली आहे. यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे म्हणत उदय सामंत म्हणाले, शिंदेंना त्रास होऊ नये, म्हणून किरण सामंतांनी माघारीची पोस्ट डिलीट केली असल्याचे म्हटले तर यावर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ‘नारायण राणे यांनी किरण सामंत यांची लायकी काढली, दम दिला हे कोकणातील जनतेने पाहिलंय. दम देऊन नारायण राणे उमेदवारी मागे घेण्यास सांगू शकतात पण दम देऊन मतदान करायला सांगू शकत नाही, त्यामुळे ७ मे जनता दाखवून देईल’, असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंतांना यांना खोचक टोला लगावला आहे तर भाजप नेते मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकाही केली आहे. तर केंद्रीय मंत्री असताना कोकणात काय काम केलं याचा हिशोब जनता मागेल, असेही वैभव नाईक यांनी म्हटले.