… म्हणून भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यासह त्यांनी भाजप आणि शिवसेना यांची युती का तुटली, याचे कारणही सांगितले. वैभव नाईक म्हणाले, भाजप अजित पवार यांना कधीच मुख्यमंत्री करणार नाही
नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना काल ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करा, असं आव्हान भाजपला दिल्याचे पाहायला मिळाले. तर आज अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यासह त्यांनी भाजप आणि शिवसेना यांची युती का तुटली, याचे कारणही सांगितले. वैभव नाईक म्हणाले, भाजप अजित पवार यांना कधीच मुख्यमंत्री करणार नाही. भाजपने राष्ट्रवादी तोडण्यासाठी अजित पवार यांचा वापर करून घेतला असल्याचा मोठा दावा केला. तर गेले २५ वर्ष शिवसेनेचा वापर भाजपने केला. तर पुढे उद्धव ठाकरे यांनी हा वापर होऊ दिला नाही म्हणून भाजप शिवसेना युती तुटली, असल्याचेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 12, 2023 01:32 PM
Latest Videos