चंद्रयान-3 चंद्रावर पोहोचू शकते मात्र खड्डे पर्यंत पालिका नाही; ठाकरे गटाने कुठे केलं अनोखे आंदोलन?
मुंबईतील अनेक रस्त्यांवर खडे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यावरून राजकीय पक्षांकडून आंदोलने आणि निदर्शनं करण्यात येतात. यावेळी ठाकरे गटाकडून देखील अनोखं आंदोलन केले आहे.
अंधेरी (मुंबई) : 24 ऑगस्ट 2023 | मुंबईमधील अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठं मोठं खड्डे पडलेले आहेत. ज्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर यावर महापालिकेकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. यावरून वाहनधारकांच्यात संपात दिसत आहे. तर राजकीय पक्षांकडून याविरोधात आवाज उठवला जातोय.
अनोखं आंदोलन
मुंबईतील अंधेरी येथे एक अनोखं आंदोलन सध्या जोरदार चर्चेत असून ते ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. यावेळी ठाकरे गटाकडून बिग बी अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्या बाहेर मोठ्या खड्ड्या विरोधात मध्यरात्री आंदोलन करण्यात आले आहे.
अमिताभ बच्चन
जुहू परिसरातील अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्या बाहेर रस्त्यावर दोन ते तीन फुटाचा खड्डा पडला आहे, या खड्डे मध्ये दिवे लावून मध्यरात्री ठाकरे गटाकडून पालिकाविरोधत निदर्शन करण्यात आली. तसेच अंधारात वाहन चालकाचा या खड्ड्यामुळे अपघात होऊ नये म्हणून खड्ड्यात दिवे लावण्यात आले. तसेच खड्ड्याभोवती रांगोळी देखील काढण्यात आली. त्यामुळे याची चर्चा परिसरात होत आहे.
चंद्रयान-3
तर ठाकरे गटाकडून अंधेरी पश्चिम परिसर खड्डा मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर चंद्रयान-३ मोहीमेवरून पालिकेवर टीकास्त्र सोडत चंद्रयान-3 चंद्रावर पोहोचू शकतं मात्र पालिका खड्डा भरण्यासाठी खड्डेपर्यंत नाही असे म्हणत निषेध व्यक्त करण्यात आली आहे.