रिल अन् रिअल लाईफमधील कामात फरक नसावा, तानाजी सावंत यांना ओमराजे निंबाळकरांचा खोचक टोला
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात परंडा शहरातील बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा झाला होता. त्यात तानाजी सावंतांनी विरोधकांना सज्जड दम भरला तर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची हमी दिली. यावरून ओमराजे निंबाळकरांनी प्रतिक्रिया देत त्यांना खोचक टोला लगावला आहे.
आपण काम करायचं, मी काम करणारा साधा माणूस तेवढा मोठा माणूस नाही. सामान्य लोकांच्या कामाला जर आपण पडलेलो असू आणि आपल्या रिल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये जे काम करतोय ते आणि सोशल मीडियावर दाखवतो ते या दोन्हीमध्ये कशाचा फरक नसेल तर लोक आपलं काम मान्य करतात जर फरक असेल तर उघड पाडतात, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावला आहे. ‘सर्व राज्याला माहिती आहे की मी काय करु शकतो. कोणी चिमटा घेतला की, मी चिमटा काढत नाही त्याला घोडा लावतो हे ध्यानात ठेवा, असं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. परंडा शहरातील कार्यकर्ता मेळाव्यातून त्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Aug 13, 2024 01:08 PM
Latest Videos