Special Report | ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर घात की अपघात?

Special Report | ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर घात की अपघात?

| Updated on: Jun 11, 2023 | 6:28 AM

धाराशिवमधील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत घात की अपघात? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : धाराशिवमधील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे एका अपघातातून बचावले. पण ओमराजे निंबाळकर यांच्यावर घात की अपघात? याचीच चर्चा धाराशिवमध्ये होऊ लागली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे रोज सकाळी व्यायामासाठी बाहेर पडतात. आज सकाळी ते गोवर्धनवाडी ते तेर या रोडवर व्यायामासाठी जात होते. तेवढ्यात एक दुर्घटना घडता घडता वाचली. सीड फार्मजवळ पाठीमागून जोरदार वाहनाचा आवाज आला. त्यावेळी एक भरधाव टिप्पर एमएच 44 के 8844 आले. ते अंगावर येत असल्याचे पाहताच त्यांनी उडी मारली. त्यानंतर पाठीमागून येत असलेल्या उमेश थोडसरे यांच्यात मोटर सायकलवर पाठलाग केला. त्यावेळी टिप्पर रेल्वे फाटकवर थांबले होते. ड्राइव्हरने त्याचे नाव रामेश्वर कांबळे सांगितले. तो बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील आहेत. हा प्रकार ओव्हरटेक करताना चुकीने घडल्याचे सांगितले. कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. पण हा घातपात होता की खरंच अपघात याचा तपास अद्याप सुरू आहे.

Published on: Jun 11, 2023 06:28 AM