दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय?
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत?. यातून कोणता माल नाशिकला पोहचला? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला. इतकंच नाहीतर निवडणूक आयोग फालतु नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय
नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले…नुसता पै पाऊस अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाणा साधला आहे. केवळ दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री खाऊ घेऊनआले तो क्षण! असं म्हणत राऊतांनी एक व्हिडीओ अटॅच करत नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस पडतोय’ असे राऊतांनी म्हटले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल पोलीस आहेत. त्यांच्या हातामध्ये काही बॅग दिसतायत. त्यावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत?. यातून कोणता माल नाशिकला पोहचला? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला. इतकंच नाहीतर निवडणूक आयोग फालतु नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.