कुणी घेतली कुणाची सुपारी? संजय राऊत आणि नरेश म्हस्केंमध्ये जुंपली?; कुणाचा आरोप काय?

कुणी घेतली कुणाची सुपारी? संजय राऊत आणि नरेश म्हस्केंमध्ये जुंपली?; कुणाचा आरोप काय?

| Updated on: Jun 11, 2024 | 5:35 PM

Sanjay Raut vs Naresh Mhaske : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेनेवर खळबळजनक आरोप, शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी काय केला पलटवार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना हे तिनही पक्ष सुपाऱ्या घेऊन तयार झाले आहेत, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर पवार गटासह ठाकरे गटाला कमजोर कऱण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेनेला सुपाऱ्या दिल्यात, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या खळबळजनक आरोपांनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संपवण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून सुपारी घेतली, असा हल्लाबोल नरेश म्हस्के यांनी केला आहे. बघा व्हिडीओ काय केला आरोप-प्रत्यारोप?

Published on: Jun 11, 2024 05:33 PM