#Panauti वरून नितेश राणे vs संजय राऊत, चपट्या पायांपासून ते घरची पनवती, कुणाचा कुणावर काय हल्लाबोल?
क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. या पराभवानंतर सर्वच भारतीय आणि क्रिकेटप्रेमीचं हृदय तुटलं, मात्र यादरम्यान, सोशल मीडियावर #Panauti ट्रेंड सुरू झाला तो राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांपर्यंत येऊन पोहोचलाय.
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. या पराभवानंतर सर्वच भारतीय आणि क्रिकेटप्रेमीचं हृदय तुटलं, मात्र यादरम्यान, सोशल मीडियावर #Panauti ट्रेंड सुरू झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यादरम्यान पंतप्रधान मोदी उपस्थित होते. म्हणून भारतीय संघ हरला असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. तर पराभवानंतर खेळाडू निराश झाले होते मात्र मोदींनी ड्रेंसिंगरूममध्ये जाऊन त्यांना प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत पनौतीचा ट्रेंड अनेकांना समजला नसला तरी राज्याच्या राजकारणात पनवतीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतोय. महाराष्ट्रात पनवती समजले जाणारे बाहेर जाऊन प्रचार करतात. तर बाहेर जावून हिंदूत्वाचा प्रचार करतात इथे कोणी विचारत नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावर प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले, संजय राऊत हे चपट्या पायाचे, तेच मोठे पनवती… संजय राऊत जिथे जातो ते घर फोडतोय, आता पक्ष फोडतो उद्धव ठाकरेला चिटकला आता उद्धव ठाकरेची काय अवस्था झाली ते पहा…असे एकेरी उल्लेखही केलाय.