‘कसला फेव्हिकॉलचा जोड?’, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीस यांच्यावर जोरदार घणाघात
मुंबई : बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून शिंदे गटाला डिवचले आहे. यानंतर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देताना अनिल बोंडे यांची औकातच काढली. तर राज्य सरकारमध्ये अजिबात काही अलबेल नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काल पालघर जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, आमची मैत्री तुटायची नाही, ये फेव्हिकॉल का मजबूत जोड है… त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. फेव्हिकॉलच्या ट्यूब आहे ते पाहावं लागेल. फेव्हिकॉल आहे की मधाचे चार थेंब आहेत हे पाहावे लागेल. फडणवीस यांच्या प्रवक्त्याने बेडकाची उपमा दिली. मग हा फेव्हिकॉलचा जोड म्हणायचा? काल तर सीएम आणि डीसीएम एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते. कसला फेव्हिकॉल का जोड आहे? जोडबिड काही नाही. पुढच्या दोन महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल. त्यानंतर सरकार गेल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.