योगी को बचाना है, तो मोदी को... 'सामना'च्या 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी काय केले मोठे दावे?

योगी को बचाना है, तो मोदी को… ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी काय केले मोठे दावे?

| Updated on: May 26, 2024 | 4:56 PM

नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे केले आहे. 4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले असल्याचे राऊत म्हणाले.

सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे दावे केले आहे. यामध्ये नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबतही संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊत रोखठोकमधून असे म्हणाले की, 4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल, असे संजय राऊत म्हणाले.

Published on: May 26, 2024 04:56 PM