राहुल कुल यांचे नाव घेत संजय राऊतांचा सीबीआय आणि ईडीवर घणाघात
विरोधी पक्षातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात ईडी, सीबीआय तपास यंत्रणांची कारवाई भाजपकडून सुरु असते. मात्र भाजपच्याच नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबली जातात असे त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार, राज्य सरकारसह ईडी आणि सीबीआयवर तोफ डागली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात ईडी, सीबीआय तपास यंत्रणांची कारवाई भाजपकडून सुरु असते. मात्र भाजपच्याच नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबली जातात असे त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये जी लोक टाकली जातात त्यांच्यावर का कारवाई होत नाही, त्यावेळी या दोन संस्था काय करतात असा सवाल त्यांनी केला आहे. तर आपण स्वतः गेला पंधरा दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि सीबीआयकडे पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या 500 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले . तसेच याबाबत आपण पुरावे देऊनही अजूनही का कारवाई केली गेली नाही. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं असेही ते म्हणाले.