Special Report | … तर पाच लाख रूपये द्यायला तयार, संजय राऊत यांचं नेमकं चॅलेंज काय?
VIDEO | BJP वर ED कारवाई दाखवा, लाखोंचं बक्षीस मिळवा.. सांगलीतील बॅनरबाजीनंतर नेत्यांमध्येच जुंपली
मुंबई : भाजप नेत्यावरील ED कारवाई दाखवा आणि १ लाख रूपयांचं बक्षीस मिळवा, असं बॅनर सांगली जिल्ह्यातील जतमध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मी एक नाही तर पाच लाख रूपये द्यायला तयार आहे, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. ‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, अशी बॅनरबाजी सांगलीत केली. जयंत पाटील यांना ED ने नोटीस बजावली याविरोधात जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावलेत. पण भाजप नेत्यावर EDची कारवाई झाल्याचे दाखवले तर एक नव्हे तर पाच लाख रूपये देईन, असं संजय राऊत यांनी चॅलेंज दिले आहे. गेल्या वर्षी इंडियन एक्स्प्रेसने २०१४ नंतर ईडीच्या कारवाईवर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. २०१४ नंतरच्या ८ वर्षात १२१ राजकीय नेत्यांवर कारवाया झाल्यात, यामध्ये १२१ पैकी ११५ नेते हे विरोधी पक्षातील होते. तर इतर कारवायांमध्ये व्यावसायिकांचा समावेश आहे. आता पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही गट यामधील नेत्यावर ईडीची कारवाई झाली पण योगायोगाने भाजपवर एकही ईडीची कारवाई झाली नाही, बघा या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट