'दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचं कारण काय', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

‘दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचं कारण काय’, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Mar 21, 2023 | 3:44 PM

VIDEO | विरोधकांकडून राजीनामा देण्याच्या टीकेवर संजय राऊत यांनी स्वतः खासदारकीच्या पदावर काय केले भाष्य?

नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवीदिल्लीत दादा भुसे यांच्यावर टीका केली आणि त्यांचे पडसाद थेट विधिमंडळात पाहायला मिळाले. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, मी ज्यापद्धतीने खुलासा मागितला दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचं कारण नव्हतं असं खोचक वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, मी आरोप नाही तर शेतकऱ्यांच्यावतीने खुलासा मागितला. गिरणा ऍग्रो कंपनीच्या नावाखाली दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून 175 कोटी 25 लाखावर शेअर्स गोळा केले. आणि त्या संदर्भातील वेबसाईट आहे त्याच्यावरती फक्त साधारण दीड कोटी रुपये दाखवून 47 शेतकऱ्यांच्या नावाने रक्कम दाखवते. एक फेब्रुवारीपासून या प्रश्नावर त्या भागातील शेतकरी आंदोलन करताय. त्यावर खुलासा मागितला मी भ्रष्टाचाराचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे दादा भुसे यांनी असे बेबंध होऊन बोलणे योग्य नसल्याचा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

Published on: Mar 21, 2023 03:44 PM