गाजावाजा करत 2 हजारांची नोट दाखवत होते अन् आता…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन हजारांच्या नोटबंदीच्या निर्णयावर म्हणाले...
नांदेड : गाजावाजा करुन दोन हजारांची नोट आणली होती. आता ती बंद केली, असं भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन हजारांच्या नोटेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, काळापैसा परत आणू, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचं कंबरडं मोडलं जाईल असे म्हणाले होते, ते काहीच झालं नाही. लोकांना रांगेत उभं केलं. लोकांना अत्यवस्थ केलं. पुन्हा केंद्र सरकार त्याच मार्गावर आल्याचे म्हणत हजार, पाचशे रूपयांची नोटबंदी केली ती नोट परत येणारे का? असा सवाल करत संजय राऊत यांनी दोन हजारांच्या नोटबंदीवर आपली भूमिका मांडली. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा केलाय. त्यामुळे महागाईपासून बेरोजगारीचा भस्मासूर उभा राहिला असल्याचे संजय राऊत यांनी म्हणत मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
जळगाव जिल्हा आणि खान्देशातील मंजूर झालेले अनेक विकास प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, अशी मागणीही केली. यावर संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, विदर्भाची पुर्वी तशीच मागणी होती. तशी आता खान्देशची आहे. खान्देशचे काय प्रश्न असतील तर एकनाथ खडसे यांनी ते उठवले पाहिजे. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असे संजय राऊत म्हणाले. तर एकनाथ खडसे यांच्या सारखे प्रमुख नेते विरोधी पक्षात असताना जर प्रश्नच उपस्थित केले गेले नाही तर विकास कसा होणार…असेही पुढे संजय राऊत यांनी म्हटले आहे.