Saamana : आंध्र-बिहारवर सरकारी तिजोरीतून दौलतजादा… हाच ‘सब का विकास’ का? ‘सामना’तून अर्थसंकल्पावर टीका
केंद्रीय सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस व द्वेष भरला आहे, हेच केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. सरकारची कुबडी बनलेल्या आंध्र व बिहार या दोन राज्यांवर सरकारी तिजोरीतून दौलतजादा करणाऱ्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय झाला आहे, असे सामनातून म्हटले
केंद्राच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस आणि द्वेष आहे ते दिसंल असं म्हणत ‘सामना’तून केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका करण्यात आली. तर अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय झाला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात साधा महाराष्ट्राचा उल्लेखही केला नसल्याचेही सामनातून म्हटले आहे. ‘खोके’शाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रात घटनाबाहय सरकार सत्तेवर आणूनही केंद्रीय सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस व द्वेष भरला आहे, हेच केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. सरकारची कुबडी बनलेल्या आंध्र व बिहार या दोन राज्यांवर सरकारी तिजोरीतून दौलतजादा करणाऱ्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय झाला आहे, असे सामनातून म्हटले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे सर्वात मोठे करदाते राज्य असणे हा महाराष्ट्राचा दोष आहे काय? केवळ राजकारण व सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यांत रिकामी करणे, यालाच ‘सब का साथ, सब का विकास’ असे म्हणतात काय? असा सवालही सामनातून करण्यात आलाय.