Vibrant Gujarat : ‘मारू मुंबई’चा धोका म्हणत संजय राऊत यांचं व्हायब्रंट गुजरातवर रोखठोक भाष्य करत सडकून टीका

Vibrant Gujarat : ‘मारू मुंबई’चा धोका म्हणत संजय राऊत यांचं व्हायब्रंट गुजरातवर रोखठोक भाष्य करत सडकून टीका

| Updated on: Oct 15, 2023 | 9:51 AM

VIDEO | मुलुंडमध्ये मराठी कुटुंबास जागा नाकारली, 'मारू घाटकोपर' असे बोर्ड झळकले. मुंबईत 'व्हायब्रंट गुजरात'चे सोहळे झाले, त्यात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील उद्योगपतींनी गुजरातला यावे असे आवाहन केले. यावरून सामनातून रोखठोक भाष्य करत थेट हल्लाबोल केला आहे.

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | मुंबईमध्ये व्हायब्रंट गुजरातचे सोहळे झालेत. मारू मुंबईचा धोका, असे म्हणत सामनातून सरकारवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या सामनातील रोखठोक या सदरातून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्हायब्रंट गुजरातवर सडकून टीका करण्यात आली आहे. मुलुंडमध्ये मराठी कुटुंबास जागा नाकारली, ‘मारू घाटकोपर’ असे बोर्ड झळकले. मुंबईत ‘व्हायब्रंट गुजरात’चे सोहळे झाले, त्यात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील उद्योगपतींनी गुजरातला यावे असे आवाहन केले. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना काही वावगे वाटले नाही, हे आश्चर्यच असं सामनातून म्हटलं असून व्हायब्रंट गुजरातवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तर मुंबईचे ओरबाडणे आता नित्याचेच झाले. एक दिवस हे लोक मुंबईच पळवून नेतील. त्यासाठी मराठी लोकांत फूट पाडण्याचे कारस्थान पूर्ण झाले आहे, असे म्हणत सामनातून घणाघात करण्यात आलाय.

Published on: Oct 15, 2023 09:51 AM