‘नारायण राणे यांचं टिल्लू मला धमकी देतंय’, संजय राऊत यांचा हल्लाबोल; बघा काय केली गंभीर टीका
VIDEO | 'सरकार तुमचं आहे ना मग...', ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची नितेश राणे यांच्यावर सडकून टीका
कोल्हापूर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. इचलकरंजीमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेच्या सभेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लोबोल केला. भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी जोरदार खिल्ली उडवली. नारायण राणे यांचं टिल्लू पोरगं मला धमकी देतंय…संजय राऊत यांची सिक्युरिटी काढा… पण तुझं सरकार आहे का? काढून दाखव.. कोकणात शिवसैनिक गेले तेव्हा नितेश राणे यांनी स्वतःला कोंडून घेतले. १०० बोगस कंपन्या असल्याने नोटीस दिली, आधी शिवसेना, काँग्रेस सोडली आता भाजपामध्ये आणि मला शिकवतोय निष्ठेच्या गोष्टी असे म्हणत त्यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
Published on: Mar 02, 2023 09:11 PM
Latest Videos