'मातोश्री'वर बाळासाहेबांच्या खुर्चीसमोर किती शपथ घेतल्या त्यांच्यावर काय विश्वास ठेवताय? राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

‘मातोश्री’वर बाळासाहेबांच्या खुर्चीसमोर किती शपथ घेतल्या त्यांच्यावर काय विश्वास ठेवताय? राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

| Updated on: Feb 21, 2024 | 1:26 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपत्री शिवरायांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचा शब्द दिला होता तर मराठ्यांना १० टक्के आरक्षण दिल्यानंतर शिंदेंनी शपथ पूर्ण केली असं म्हटले. यावरून संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपत्री शिवरायांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचा शब्द दिला होता तर मराठ्यांना १० टक्के आरक्षण दिल्यानंतर शिंदेंनी शपथ पूर्ण केली असं म्हटले. यावरून संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ खोटी आहे. बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी अनेकदा शपथ घतेलेली आहे. या लोकांनी आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून कितीवेळा शपथ घेतलेली आहे. बाळासाहेबांच्या समाधीसमोर, बाळासाहेबांच्या मातोश्रीवर खुर्चीसमोर उभं राहून यांच्या शपथांवर काय विश्वास ठेवताय? असा सवाल करत त्यांनी हल्लाबोल केला तर मंगळवारी जो सरकारने फसवणुकीचा प्रकार केला 10 टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली. सरकार त्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरलेले आहे. अशावेळी उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहेत का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचतायत रस्त्यावर. जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे, मराठा समाज अस्वर संसदेचखलीत तैनात पोलीस अधिकान्याला विस्ता आहे हे असे नाचून प्रश्न सुटणार आहेत का?, असा सवालही राऊतांनी केलाय.

Published on: Feb 21, 2024 01:26 PM