माझ्यावरील संस्कार गुडघे टेकण्याचे नाहीत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

माझ्यावरील संस्कार गुडघे टेकण्याचे नाहीत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Mar 25, 2023 | 7:34 PM

VIDEO | त्या विधिमंडळाबद्दल मी अशब्द कसा वापरेल? सवाल उपस्थित करत संजय राऊत यांचा घणाघात

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी ज्याप्रमाणे रद्द केली, तशीच माझी खासदारकी रद्द करण्याचा प्रयोग चालू आहे. मी माफी मागितली असती तर तुरुंगातही गेलो नसतो. माझ्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं रक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचं रक्त आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर केलेले संस्कार गुडघे टेकण्याचे नाहीत, असे म्हणत संजय राऊत जोरदार हल्लाबोल केला आहे. यासह सर्वोच्च न्यायालयात चोर मंडळाच्या बाबतीत प्रकरण प्रलंबित आहे. एका विशिष्ट गटापुरता तो शब्द आहे. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत चारवेळा निवडून पाठवलं त्या विधिमंडळाबद्दल मी अशब्द कसा वापरेल? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर संजय राऊत याच्याविरोधात काहीना काही काड्या करत राहायच्या. तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू घालू, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

Published on: Mar 25, 2023 07:34 PM