‘माझ्यासारखा सभ्य माणूस नाही’, संजय राऊत यांनी कुणाला लगावला उपरोधिक टोला
VIDEO | शिवसेनेतील बंडखोर आमदारांबरोबरच खासदारांवरही संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले बघा व्हिडीओ
कोल्हापूर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यापासून शिवसेनेतील बंडखोर आमदारांबरोबरच खासदारांवरही जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले धैर्यशील माने यांचे नाव कुणी ठेवलं आहे. त्यांच्या नावातील धैर्य या शब्दाचा तो अपमान असल्याचा खोचक टीका केली आहे. सभागृहातील उपस्थित लोकांनी बंडखोर आमदार आणि खासदार यांच्याविरोधात जोरदार टीका केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ही भाषा आता लोकं वापरत आहेत. मात्र विरोधक म्हणतात की, मी असभ्य भाषा वापरतो आहे.मात्र मी अशी भाषा वापरत नाही, कारण माझ्यासारखा सभ्य माणूस नाही. मी एक संपादक आहे. माझं मला भान ठेवलं पाहिजे असंही त्यांनी उपरोधिकपणे टोला लगावला.

कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट

नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं

नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
