Eknath Shinde राज्याचे पालक, थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर…, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
VIDEO | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ रुग्ण मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आह. घडलेल्या या घटनेवरून विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला जातोय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे.
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ रुग्ण मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राजकीय वर्तुळात विरोधकांकडून सरकारवर जोरदार निशाणा साधला जातोय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, ही पहिलीच घटना नाहीये. याआधी देखील ठाण्यातील कळव्याच्या पालिका रुग्णालयातही असा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. कळव्यातील प्रकरणानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असा प्रकार कसा घडू शकतो? त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे पालक नाहीत. ते संपूर्ण राज्याचे पालक आहेत. राज्यात काही रूग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. राज्यात तुटवडा असताना सरकारला फक्त जमिनीचे व्यवहार, परदेश दौरे आणि माणसं फोडण्यातच इंटरेस्टेड आहे. जर यांच्यात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.