'जहाल' संजय राऊत ! भाजप-शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करताना काय केली जहरी टीका

‘जहाल’ संजय राऊत ! भाजप-शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करताना काय केली जहरी टीका

| Updated on: Mar 21, 2023 | 8:39 PM

VIDEO | संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केलेल्या जहरी टीकेवर भाजप आणि शिवसेना नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले काय म्हटले बघा...

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना जहाल शब्दप्रयोग केले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था काही जणांच्या कोठ्यावर नाचत आहे, असे वक्तव्य केले तर राज्यातील गरीबांना शिधा मिळत नाही मात्र आमदारांना खोक्यात शिधा मिळतो, असेही ते म्हणाले. यावेळी कृषीमंत्री दादा भूसे यांच्याबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. दरम्यान, चुंबन प्रकरणात एसआयटीची स्थापना होते, मात्र बार्शी प्रकरणात का नाही? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Published on: Mar 21, 2023 08:39 PM