मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील तर..., दावोस दौऱ्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील तर…, दावोस दौऱ्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Jan 19, 2024 | 11:45 AM

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावरून कोट्यवधींचे करार करून महाराष्ट्रात परतले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

मुंबई, १९ जानेवारी २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर होते. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावरून कोट्यवधींचे करार करून महाराष्ट्रात परतले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. ‘दावोसची गुंतवणूक इथे येण्याआधी आपल्या बाजूच्या राज्यात जी गुंतवणूक पळवून नेली ती परत आणली तर मुख्यमंत्र्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल’, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले की, अनेक प्रकल्प गुजरातला गेले. आजही मुंबईला ओरबाडण्याचे काम सुरू आहे. दावोसचे आकडे खूप मोठे आहेत. पण आमच्यासमोर एकट आकडा आहे तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातील ८ हजार कोटींचा अँब्लुलन्स घोटाळा. यामुळे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डोळे पांढरे होणार नसतील तर हे या महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 19, 2024 11:45 AM