'देवेंद्र फडणवीस यांचं अंतरंग वेदनेनं धडधडतंय', संजय राऊत यांची खोचक टीका

‘देवेंद्र फडणवीस यांचं अंतरंग वेदनेनं धडधडतंय’, संजय राऊत यांची खोचक टीका

| Updated on: Apr 26, 2023 | 12:53 PM

VIDEO | 'आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे...', ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्र्यांबाबत असं का म्हणाले?

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही लढू असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या या विधानाची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. फडणवीस खोटं बोलत आहेत. त्यांच्या अंतरंगात काय आम्हाला माहीत आहे. फडणवीस अपमान सहन करून उपमुख्यमंत्री झाले आहेत. ते बोलतात एक. पण त्यांच्या अंतरंगात वेदना आहे. त्यांच्या जवळच्या लोकांना माहीत आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचं अंतरंग धकधकतंय नुसतं, अशी जहरी टीका त्यांनी केली. तर पत्रकार परिषद घेत असताना बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाबाबत देखील भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर ही जोरदार टीका केली. हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी… आम्हाला शहाणपणा शिकवू नका; असा इशाराच संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला. बारसूबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. तर प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. उद्योग आला तर रोजगार वाढेल ही भूमिका कायम आहे. पण एअर बस का बाहेर गेली? फॉस्कॉन वेदांत का बाहेर गेला? त्यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावं, अशी टीकाही त्यांनी उदय सामंत यांच्यावर केली.

Published on: Apr 26, 2023 12:48 PM