कोण फडणवीस? चोरांचे सरदार, त्याच सरदाराला तुरुंगात पाठवायचं; राऊतांचा घणाघात
उद्धव ठाकरे हे धाराशिव आणि लातूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांची लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सभा पार पडली. यासभेत संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस हल्लाबोल केला. या जाहीर सभेतून संजय राऊत नेमके काय काय म्हणाले बघा...
लातूर, ७ मार्च २०२४ : उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिव आणि लातूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांची लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सभा पार पडली. यासभेत संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, कोण फडणवीस? चोरांचे सरदार… याच चोरांच्या सरदाराला तुरुगांत पाठवायचं आहे. इतकंच नाहीतर त्यांनी मोदी गँरटीवरूनही सडकून टीका केली. राऊत म्हणाले, ‘इथला आमदार त्यांचा पीए होता. हा देखील त्या चोरांच्या सरदारापैकी एक मेंबर आहे. अभिमन्यू पवार… त्याने लातूर औसासाठी काय केलं ते सांगा. आगामी लोकसभा आपल्याला जिंकायची आहे आणि ती जिंकू…औसामध्ये भगवा फडकवायचाय.. मोदी बिदी सब झूठ…मोदींची गॅरंटी वगैरे काही नाही, इथे फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची गँरटी..तर मोदी म्हणजे विश्वासघाताचे दुसरे नाव…’, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस आणि मोदी गँरंटीवर सडकून टीका केली.