उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये तर…, संजय राऊत यांनी उद्योगमंत्र्यांना चांगलंच सुनावलं
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फटकारलं, नेमकं काय म्हणाले बघा व्हिडीओ
मुंबई : बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ नये म्हणून तेथील स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. बारसूकरांचा प्रकल्पाला विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. यासह हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी… आम्हाला शहाणपणा शिकवू नका; असा इशाराच संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला. बारसूबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. नाणारला पर्याय देण्यासंदर्भात एक भूमिका नक्की घेतली. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. उद्योग आला तर रोजगार वाढेल ही भूमिका कायम आहे. पण एअर बस का बाहेर गेली? फॉस्कॉन वेदांत का बाहेर गेला? त्यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावं. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पर्यायी जागा सूचवली. तेव्हा हालचाली नव्हती. लोक आता पुढे आली असतील तर त्या पत्राला आमच्या दृष्टीने शून्य किंमत आहे. तो शासकीय कागद आहे. उद्धव ठकारे यांचंही ते म्हणणं आहे. कोणता तरी सरकारी कागद फडकवत उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये. नाणारला जावं आणि लोकांशी बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.