'मातोश्रीचा धसका कायम', संजय राऊत यांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

‘मातोश्रीचा धसका कायम’, संजय राऊत यांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Jun 11, 2023 | 12:19 PM

VIDEO | 'भाजपचं महासंपर्क अभियान होतं की...', संजय राऊत यांची अमित शाह यांच्यावर खोचक टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेडच्या सभेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नांदेडमधील शहा यांचं भाषण मजेशीर आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे. ‘गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन. अमित भाई यांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम. शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय.’ असे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

Published on: Jun 11, 2023 12:06 PM