Sanjay Raut : एखाद्याला खून करण्याचं उत्तेजन द्यावं, असं विधानसभा अध्यक्षांचं काम, संजय राऊत यांचा घणाघात
VIDEO | सुप्रीम कोर्टात झालेल्या शिवसेना अपात्र आमदारांच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. सुनावणीच्या प्रकरणावर निर्णय घेण्याची तुमची जबाबदारी आहे. किती वेळ लागतो निर्णय द्यायला. तुमच्याकडे याकरता वेळ नाहीये का? असा सवालही राऊतांनी केला
मुंबई, १४ ऑक्टोबर, २०२३ | शुक्रवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या शिवसेना अपात्र आमदारांच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे इलेक्शन ट्रॅब्यूनल आहे. सुनावणीच्या प्रकरणावर निर्णय घेण्याची तुमची जबाबदारी आहे. किती वेळ लागतो निर्णय द्यायला. तुमच्याकडे याकरता वेळ नाहीये का? तुम्ही आम्हाला कायदा शिकवता. आम्हाला कायदा अन् संविधान माहिती आहे. आता तुम्हाला जावं लागेल आणि विधानसभा अध्यक्षांना देखील जावं लागेल, असे म्हणत त्यांनी इशारा दिला. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. यावर राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने पोरखेळ हा शब्द वापरला आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम अध्यक्ष आणि घटनाबाह्य सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली. एखाद्या खुन्याला संरक्षण द्यावं, आश्रय द्यावा आणि त्याला खून करण्याचं उत्तेजन द्यावं असं काम हे विधानसभा अध्यक्ष करत आहेत. त्यांना कायदा कळत नाही का? असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली.