संजय राऊत याचं पुन्हा एक ट्वीट आणि मविआत एकच खळबळ? विरोधकांना आयतं कोलीत
ही जागा काँग्रेसची असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर यावर कोणाची ताकद जास्त त्याला ती जागा म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपला ही दावा सांगितला आहे. त्यावरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत.
मुंबई : भाजपचे खासदार दिवंगत गिरीश बापट यांचं निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर आता यावर पोटनिवडणुकीची चर्चा सुरू होऊ लागली असतानाच सर्व पक्षांनी आप आपली तयारी केली आहे. मात्र यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील वाद समोर आला आहे. ही जागा काँग्रेसची असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर यावर कोणाची ताकद जास्त त्याला ती जागा म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपला ही दावा सांगितला आहे. त्यावरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी, प्रत्येकानं थोडा थोडा त्याग करण्याचं आवाहन केलं आहे. तर “कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्तर ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकानं थोडा थोडा त्याग करावाच लागेल. जय महाराष्ट्र”, असं म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अजित पवार, नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खर्गे या तिघांना टॅग केलं आहे.