'मनसे'ला जय महाराष्ट्र करणाऱ्या वसंत मोरे यांना संजय राऊत यांचा खोचक सल्ला काय?

‘मनसे’ला जय महाराष्ट्र करणाऱ्या वसंत मोरे यांना संजय राऊत यांचा खोचक सल्ला काय?

| Updated on: Mar 12, 2024 | 4:05 PM

वंसत मोरे यांनी आज सकाळी आपली नाराजी व्यक्त केली तर दुपारी थेट राजीनाम्याचं पत्र फेसबूकवर शेअर करत मनसेला सोडचिठ्ठी दिली. वसंत मोरे यांच्या या राजीनाम्याच्या पोस्टने एकच खळबळ उडाली. दरम्यान, मनसे पक्षातील या मोठ्या घडामोडीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले

नाशिक, १२ मार्च २०२४ : पुण्यातील फायरब्रँड नेते वंसत मोरे यांनी आज सकाळी आपली नाराजी व्यक्त केली तर दुपारी थेट राजीनाम्याचं पत्र फेसबूकवर शेअर करत मनसेला सोडचिठ्ठी दिली. वसंत मोरे यांच्या या राजीनाम्याच्या पोस्टने एकच खळबळ उडाली. दरम्यान, मनसे पक्षातील या मोठ्या घडामोडीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. वसंत मोरे यांनी फक्त भाजपच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये, असा खोचक सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना दिला. संजय राऊत म्हणाले, वसंत मोरे लोकसभा लढणार असतील तर ते कुणाकडून लढणार आहेत? हे त्यांनीच सांगून आपली भूमिका स्पष्ट करावी असे संजय राऊत यांनी म्हटले तर यावेळी त्यांनी वसंत मोरे यांनी खोचक सल्लाही दिला. ते म्हणाले, वसंत मोरे यांनी फक्त भाजपच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. कारण ते स्वच्छ आहे. वसंत मोरे हे चांगले कार्यकर्ता आहे. जसे पुण्यात जसे रवींद्र धंगेकर आहेत तसे वसंत मोरे असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 12, 2024 04:04 PM