विधानसभेला आघाडी किती जागा जिंकणार? संजय राऊत यांनी थेट सांगितला आकडा, म्हणाले...

विधानसभेला आघाडी किती जागा जिंकणार? संजय राऊत यांनी थेट सांगितला आकडा, म्हणाले…

| Updated on: Apr 19, 2023 | 2:06 PM

VIDEO | 'मिंधे गटाचा केमिकल लोचा झालाय', संजय राऊत असे का म्हणाले? बघा काय केली टीका

मुंबई : राज्यात आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला किती जागा मिळतील आणि भाजपच्या लोकसभा निवडणुकीत किती जागा कमी होतील, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 40 जागा मिळणार असल्याचं यापूर्वी भाकीत केलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचं भाकीत केलं आहे. भाजपने मिंधे गटाबरोबर एक केमिकल लोचा करून ठेवला आहे. या राज्याचं संपूर्ण जनमत या केमिकल लोच्याविरोधात आहे. आता निवडणुका घ्या. हिंमत असेल तर… जशी महापालिकेची टाळाटाळ करता तशी विधानसभा निवडणुकीची टाळाटाळ करू नका. महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा. विधानसभेच्या किमान 185 आणि लोकसभेच्या 40 जागा आम्ही जिंकणार आहोत. यासाठी कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. अंतर्गत नाही आणि बाहेरच्या अशा कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Published on: Apr 19, 2023 02:02 PM