नाराजीनंतर आजच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर संजय राऊत म्हणाले, ‘फडणवीस यांनी बांबू…’
VIDEO | 'जो बुंद से गयी, वो हौदसे नही आती', संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काय सुनावलं?
मुंबई : शिंदे गटाने सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला आहे. जाहिरातीत चित्र स्पष्ट असलं तरी सर्व काही अलबेल नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेच्या आजच्या नव्या जाहिरातीवर भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा जाहिरातीत साधा उल्लेख नाही. बाळासाहेबांचा फोटो नाही. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना म्हणता आणि बाळासाहेबांचा फोटो नाही? काल भाजपने बांबू घातल्यामुळे, विशेषत: फडणवीस यांनी बांबू घातल्याने नवीन जाहिरात झळकलेली दिसते. पण पडद्यामागे काय घडलं हे मला माहीत आहे. जो बुंद से गयी वो हौदसे नही आती. काल बेअब्रू झाली. त्यांच्या अंतरंगात काय हे काल स्पष्ट झालं. त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाहीत, आनंद दिघेही नाही. फडणवीसही नाहीत. काल फडणवीस यांनी बांबू दिल्याने जाहिरातीत चित्र बदललं, असं ते म्हणाले. हितचिंतक अशी जाहिरात देत नाही. शत्रू देतो. हितचिंतक जपून जाहिरात देतो, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटकारले.