‘ठाकरे गटच गद्दार! शिवसेना प्रमुखांच्या विचारांना मातीत गाडलं’; शिंदे गटाच्या नेत्याचा राऊत यांच्यावर पलटवार
गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं होतं त्यावर राऊत यांनी टीका केली होती. तसेच शिवसेना फोडली, तरी ये डर अच्छा है, मातोश्रीचा एवढा धसका घेतलाय,” असं म्हटलं होतं.
कोल्हापूर : ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडून सतत शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसते. तर गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं होतं त्यावर राऊत यांनी टीका केली होती. तसेच शिवसेना फोडली, तरी ये डर अच्छा है, मातोश्रीचा एवढा धसका घेतलाय,” असं म्हटलं होतं. त्यावरून यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर निशाना साधला आहे. शिरसाट यांनी, संजय राऊत यांनी टीका केली नाही त्यांनी चोमडे पणा केला आहे. कोणाची तळी कशी उचलायची हे संजय राऊत प्रयोग करत आहेत. कसला धसका घेतला अमित शहा कुठे हा उद्धव गट कुठे कुठेतरी बरोबरी करा. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अधःपतन झालं आहे असा घणाघात केला आहे. ‘गिरेंगे तो टांग ऊपर, अशी गत राऊत यांची झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.