भाजपनं पाळलेला कोंबड्यांचा खुराडा म्हणजे…, संजय राऊत यांचा शिंदे गटाला खोचक टोला
VIDEO | शिंदे गटावर खोके फाईल्स सिनेमा करणार, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. गावात खुराडं असतं, तसं हे खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल आणि त्या कधीही कापल्या जातील. सकाळ, संध्याकाळ कोंबड्या आरवत असतता. तसे ते आहेत. कॉक कॉक कॉक करत आहेत. तसे करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? पक्ष म्हणून काय आहे त्यांच्याकडे? त्यांना काही विचारधारा आहे काय? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. तर डायरी ऑफ महाराष्ट्र खोका हा सिनेमा काढणार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. मिंधे टोळीने 22 काय 48 जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे 19 खासदार होते. महाराष्ट्रात 18 होते. आमचा 19 खासदारांचा आकडा कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.