राहुल नार्वेकर यांच्या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे अन् भाजप आमने-सामने, तर संजय राऊत यांचीही जहरी टीका

राहुल नार्वेकर यांच्या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे अन् भाजप आमने-सामने, तर संजय राऊत यांचीही जहरी टीका

| Updated on: Oct 01, 2023 | 10:23 AM

VIDEO | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, विधानसभा राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द झाला असला तरीही त्यांच्यावर संजय राऊत यांनी हल्लोबल सुरूच ठेवत सामनातून जळजळीत टीका केली, बघा काय म्हणाले?

मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द करण्यात आला मात्र तरीही संजय राऊत यांनी नार्वेकरांवर सामनातून जहरी टीका केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार हे दोघे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी राहुल नार्वेकर घानाच्या देशात निघाले आहेत. त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांचे स्वागत घानात होणार आहे काय?’, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करतात, असे वक्तव्य केले. यावर शेलारांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. ‘बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका !’ असे ट्वीट करत शेलारांनी हल्लाबोल केलाय.

Published on: Oct 01, 2023 10:16 AM