‘सरकार खूनी… यांचा काय सत्कार करायचा का?’, ‘त्या’ घटनेवरून संजय राऊत भडकले अन् केला सवाल
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे. मात्र याठिकाणी राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना त्यांची चिंता नाही'
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्रातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांत 41 मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्यामध्ये नवजात बालकांची संख्या मोठी असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, ट्रिपल इंजिनचं सरकार संख्याबळामुळं पूर्णपणे स्वस्थ आहे. पण राज्यातील सरकारी रुग्णालयं अस्वस्थ असल्याचा आरोप शिंदे सरकारवर केला जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले, ‘राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे. नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसह अनेक जिल्ह्यात मृत्यूचं तांडव सुरू आहे. मात्र याठिकाणी राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना त्यांची चिंता नाही. हे राजकारणात अडकलेले आहेत. कोणाला पालकमंत्री कोणाला खाते बदलून अशातच ते अडकले आहेत. लोकं मरतायत आणि इतकं निर्घृण, संवेदनशील, घटनाबाह्य सरकार राज्याच्या वाटेला आलं असताना हे सरकार खूनी म्हणायचं नाही तर त्यांच्या सत्कार करायचा का?’, असा आक्रमक सवाल करत संजय राऊत हे आक्रमक झाले आहे.