‘शिंदे गट लाचार एकातही धमक नाही’; संजय राऊत यांची सडकून टीका
VIDEO | ...तरी जनता शिंदे गटाला मतं देणार नाही, संजय राऊत नेमंक काय म्हणाले?
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जात आहे. येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना साजरा करणार की नाही? अशी चर्चांही सुरू आहे. तर भाजप एकीकडे म्हणतंय की ओरिजन शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, ‘भाजपला नसत्या उठाठेवा करण्याची गरज नाही. तुम्ही कधी पासून शिवसेनेचे वकील झालात? एकनाथ शिंदे यांनी कधी शिवसेना स्थापन केली. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची…त्यांनी उद्धव ठाकरे यांची कार्यकारिणीत नियुक्ती केली. परंपरेने शिवसेना ही ठाकरे यांची आहे. त्यामुळे वर्धापनदिन आमचीच शिवसेना साजरी करणार आहे’, असे राऊत म्हणाले. तर शिंदे यांना दबावापोटी निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं असलं तरी त्यांना त्या निवडणुकीत मतं मिळणार नाही. कारण जिथे ठाकरे तिथं शिवसेना…शिंदे गट लाचार आहे एकातही धमक नाही. चिन्ह आणि पक्ष विकत घेतला असला तरी जनता शिंदे गटाला मतं देणार नाही. असेही राऊत यांनी म्हणत जोरदार निशाणा साधला.