ठाकरे गटाच्या नेत्यांमागं ईडीचं भूत, ‘या’ खासदारानं भाजपवर साधला निशाणा
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर ईडीच भूत मागे लावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजप करत असलेला हा प्रयत्न आता जुना झाला आहे.
सिंधुदुर्ग, ३ नोव्हेंबर २०२३ | ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. विनायक राऊत म्हणाले, रवींद्र वायकर यांचे हे प्रकरण जुने आहे. वायकरांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर ईडीच भूत मागे लावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजप करत असलेला हा प्रयत्न आता जुना झाला आहे, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. तर ईडीचे लोक आता सुपाऱ्यां घेऊन काम करत आहेत, असे म्हणत विनायक राऊत यांनी ईडी अधिकाऱ्याला दहा लाख लाच घेत असताना पकल्याची माहितीही त्यांनी दिली. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी याप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी करणार आहेत.