'रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांची उंच झाडावर बसून पहावी', ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका

‘रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांची उंच झाडावर बसून पहावी’, ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका

| Updated on: Mar 05, 2023 | 6:30 PM

VIDEO | हीच पुनरावृत्ती रत्नागिरीतील रामदास कदम यांच्या सभेत होईल, कुणी केली जहरी टीका बघा व्हिडीओ

रत्नागिरी : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये सभा आहे. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनीही त्याच मैदानावरून उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. मोर नाचतो म्हणून तुडतुडा नाचतो असे तुडतुडे नाचत असले तरी त्याला मोराची सर येणार नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम हे पत्रकार परिषद घेणार आहे. याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले, काय करायचे ते करूदे…असेही ते म्हणाले. तर उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी रामदास कदमही जाहीर सभा घेणार आहे. काही घ्यायच्या त्या सभा घ्या, कारण मिंधेच्या परंपरेनुसार सभा जाहीर करायची आणि अर्ध्यापेक्षा खुर्च्या रिकाम्या ठेवायच्या आणि हीच पुनरावृत्ती रत्नागिरीतील रामदास कदम यांच्या सभेत होईल, असे म्हणत विनायक राऊत यांनी जहरी टीका केली.

Published on: Mar 05, 2023 06:29 PM