एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात विचारांपेक्षा अविचारांची पेरणी, ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात विचारांपेक्षा अविचारांची पेरणी, ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Oct 24, 2023 | 11:04 AM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदर विनायक राऊत यांनी शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर हल्लाबोल केलाय. तर गद्दारांना गाडण्यासाठी ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर असणार असल्याचेही म्हणत राऊत यांनी निशाणा साधलाय. देशाला राज्याला वाचवायचे असेल तर गद्दारांना गाडावंच लागेल

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | मुंबईत आज शिंदे गट आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज होणार आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दसरा मेळाव्यावरून चढाओढ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर हल्लाबोल केलाय. तर गद्दारांना गाडण्यासाठी ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर असणार असल्याचेही म्हणत विनायक राऊत यांनी निशाणा साधलाय. करोडो रूपयांचा चुराडा करून एकनाथ शिंदे यांच्याकडून आजचा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न हे गद्दार करताय. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात विचारांपेक्षा अविचारांची पेरणी जास्त होणारे, त्यामुळे राज्यातील जनतेला सुद्धा हे कळले आहे. देशाला राज्याला वाचवायचे असेल तर गद्दारांना गाडावंच लागेल, असे विनायक राऊत म्हणाले.

Published on: Oct 24, 2023 11:04 AM