देवेंद्र फडणवीस यांचा मानसिक तोल घसरला म्हणून…, ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | गद्दार मुख्यमंत्र्याच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस यांना काम कराव लागतंय, हे फडणवीसांच दुर्दैव; ठाकरे गटातील कोणत्या नेत्यानं केली टीका?
सिंधुदुर्ग : देवेंद्र फडणवीस यांचा मानसिक तोल घसरला असल्याने ते अशी विधाने करत असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. पहाटेचा शपथविधी पवारांसोबतच्या चर्चेनंतरच झाल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर विनायक राऊत बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तबगार व्यक्तीला डावलून एका गद्दाराला आणून मुख्यमंत्री म्हणून बसवलं त्याच्या हाताखाली फडणवीस यांना काम कराव लागतंय, हे देवेंद्र फडणवीसांच दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक तोल बर्याच वेळेला घसरतो त्यातून ते अशी वक्तव्य करतात. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करायचा फडणवीस यांचा धंदा झालेला आहे. स्वतःच सरकार आता बुडत चाललेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल तेव्हा या सरकारचं विसर्जन होईल, त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ते अशा प्रकारचे आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.