'मनसेसारख्या उंदरावर लक्ष द्यायची गरज नाही', ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

‘मनसेसारख्या उंदरावर लक्ष द्यायची गरज नाही’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Apr 25, 2023 | 11:54 AM

VIDEO | मनसेचे नेते आणि कार्यकर्ते सुपारी बहाद्दर, म्हणून पक्ष अधोगतीकडे, कुणी केली मनसेवर खोचक टीका बघा

सिंधुदुर्ग : मनसे सारख्या बिळातल्या उंदराच्या बोलण्याकडे आम्हाला गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. मनसेचे नेते काय आणि कार्यकर्ते काय हे सुपारी बहाद्दर आहेत म्हणून त्यांचा पक्ष अधोगतीकडे चालला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विनायक राऊत हे गल्लीतले नेते तर संजय राऊत हे बांडगुळ असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत यांनी संदीप देशपांडेसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, विनायक राऊत हे गल्लीतले नेते आहेत. चुकून गेलेले गल्लीतले नेते आहेत. त्यांची लायकी आता निवडणूकीमध्ये जनतेला कळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून त्यांनी मतं मिळवली आहेत, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी विनायक राऊत यांच्यावर केला होता.

Published on: Apr 25, 2023 11:54 AM