निवडणुका आल्यावर 'मनसे'ची सेटिंग सुरू होते, कुणाचा हल्लाबोल?

निवडणुका आल्यावर ‘मनसे’ची सेटिंग सुरू होते, कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Mar 20, 2024 | 1:51 PM

मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधणं हे दुर्देवी असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगच द्वेष नेहमी करतो, असं म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी, २० मार्च, २०२४ : निवडणुका आल्यावर मनसेची सेटिंग सुरू होते, असं वक्तव्य करून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर हल्लाबोल केलाय. तर मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधणं हे दुर्देवी असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगच द्वेष नेहमी करतो, असं म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असताना विनायक राऊत म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून सेटिंग हा शब्द आला आहे. कुणाची कुणासोबत सेटिंग केली भाजपने आणि मनसेने हे जगजाहीर झाले आहे. त्यामुळे त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. ज्या पक्ष प्रमुखांनी मनसैनिकांना नगरसेवक, आमदार, खासदार निवडणून आणण्यासाठी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याऐवजी मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला, भाजपला बांधण्याचं काम दर निवडणुकीला करतंय हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटलंय.

Published on: Mar 20, 2024 01:51 PM